Ad will apear here
Next
‘डिजी कार्ड’बाबत आयुक्तांनी घेतली मॉल आपरेटर्सची बैठक
मॉलधारकांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना महापालिका आयुक्त संजीव जयस्वालठाणे :  तेल अवीवच्या धर्तीवर राबविण्यात येणारा ‘डिजी ठाणे’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात उतरावा, यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कंबर कसली आहे. या प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग असणाऱ्या मॉलधारकांची बैठक घेऊन या प्रकल्पाची संकल्पना त्यांना समजावून सांगण्यात आली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (१) सुनील चव्हाणही उपस्थित होते. 

या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रशासन ते नागरिक, व्यावसायिक ते नागरिक आणि नागरिक ते नागरिक असा समन्वय साधण्यात येणार असून, महापालिकेच्या सर्व सुविधांची देयके भरण्यापासून ते शहरातील विविध ठिकाणी खरेदी करण्यासाठी या ‘डिजी कार्ड’चा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा फायदा जसा नागरिकांना मिळणार आहे, तसाच तो व्यावसायिकांनाही मिळणार असल्याचे या वेळी जयस्वाल यांनी स्पष्ट केले.

‘साधारणतः दोन ऑक्टोबर २०१७ रोजी ‘डिजी कार्ड’चे लोकार्पण करण्याचा मानस असून, तोपर्यंत शहरातील सर्व भागधारकांशी चर्चा करून या प्रकल्पाची माहिती देण्यात येणार आहे. क्रेडिट कार्डच्या धर्तीवरच या ‘डिजी कार्ड’ची निर्मिती करण्यात येणार असून, त्या माध्यमातून महापालिकेच्या विविध सेवांची देयके देण्याची सुविधाही उपलब्ध केली जाणार आहे,’ असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZEVBD
Similar Posts
ठाण्यातील रस्त्यांची महापालिका आयुक्तांकडून पाहणी ठाणे : ठाणे शहरामध्ये ज्या रस्त्यांची कामे सुरू आहेत, त्या सर्व रस्त्यांची महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पाहणी केली. ती कामे तात्काळ पूर्ण करण्याचे, तसेच जी कामे पूर्ण होणार नाहीत ती कामे सुरक्षित अवस्थेत आणण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शहर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी दिले
‘पारसिक बोगद्यावरील अतिक्रमण हटविणार’ ठाणे : पारसिक डोंगरावरील वन विभाग व रेल्वे विभागाच्या अखत्यारीतील पारसिक बोगद्यावरील अतिक्रमण हटविण्याच्या दृष्टीने कारवाई करण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासन, मध्य रेल्वे आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या समवेत ठाणे महापालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती
ठाणे पालिकेतर्फे दोन जुलैला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम ठाणे : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत ठाणे महानगरपालिकेतर्फे उद्या, रविवारी, दोन जुलै रोजी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत नागरिकांनी आपल्या बालकांना पल्स पोलिओचा डोस द्यावा असे आवाहन महापौर मीनाक्षी राजेंद्र शिंदे व महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले आहे.  
‘लोकांचे हेलपाटे कमी होण्यासाठी ‘डिजी ठाणे’ उपक्रम उपयुक्त’ ठाणे : ‘‘डिजी ठाणे’ हा प्रकल्प म्हणजे चेहराविरहित प्रशासनाकडे सुरू केलेली महत्त्वपूर्ण वाटचाल असून, या प्रकल्पामुळे नागरिकांचे हेलपाटे कमी होतील,’ असा विश्वास महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी व्यक्त केला. महापालिकेच्या वतीने ‘डिजी ठाणे’ प्रकल्पांतर्गत महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language